भारतीचा तपशील
भरती प्राधिकरण: निवासी उपजिल्हाधिकारी, सदस्य सचिव सेतू समिती, नांदेड
भरती प्रकार: कंत्राटी (११ महिन्यांची कालावधी)
पदाचे नाव: ग्रंथपाल
पदसंख्या: १
नोकरीचे ठिकाण: स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
मानधन: रु. 10,000/- प्रतिमाह
अर्ज पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याचा कालावधी: 15 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025
अर्ज पाठवण्याचा पत्ता: संगणक कक्ष, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
अधिकृत जाहिरात>>>>>> येथे बघा
शैक्षणिक पात्रता व इतर अटी
1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच B.Lib किंवा M.Lib परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. किमान ३ वर्षांचा ग्रंथपाल म्हणून अनुभव असलेल्यास प्राधान्य.
3. मराठी व इंग्रजी भाषेचे वाचन, लेखन आणि संभाषण येणे आवश्यक.
4. उमेदवार शारीरिक, मानसिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम असावा.
5. उमेदवाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा नोंद नसावा.
6. स्थानिक रहिवासी उमेदवारास प्रथम प्राधान्य.
7. किमान १ वर्ष काम करण्याची तयारी असावी व रु. १००/- चे शपथपत्र सादर करणे बंधनकारक.
8. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पात्र उमेदवारासही प्राधान्य दिले जाईल.
निवड प्रक्रिया
प्राप्त अर्जांची अर्हतेनुसार छाननी केली जाईल.
पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी वेळ व दिनांक कळविण्यात येईल.
अंतिम निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
संपूर्ण भरती प्रक्रिया कंत्राटी स्वरूपात असून, कायमस्वरूपी नेमणूक यामध्ये होणार नाही.
भरती प्रक्रिया संदर्भातील अंतिम अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती, नांदेड यांच्याकडे राहील.
महत्त्वाची सूचना
उमेदवारांनी भरतीसंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी नियमितपणे नांदेड जिल्ह्या
च्या नोटीस बोर्डवर किंवा https://nanded.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देत राहावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा