MESCO Bharti 2025 – महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात भरती प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (MESCO) मार्फत लिपिक, पर्यवेक्षक, स्टोअर किपर, वाहनचालक आणि इतर पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज नियोजित वेळेत सादर करावेत.
भरतीची माहिती:
भरती करणारा विभाग : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (MESCO)
भरती प्रकार : करार तत्वावरील सरकारी नोकरी
संस्था : महाराष्ट्र शासन अंगीकृत संस्था
पदाचे नाव : लिपिक, पर्यवेक्षक, स्टोअर किपर सह कॅन्टीन/वसतीगृह पर्यवेक्षक, वाहन चालक
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी
भरती कालावधी : 360 दिवसांच्या करार तत्वावर नियुक्ती केली जाईल
वयोमर्यादा : कमाल वयमर्यादा 58 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची पद्धत:
अर्जाची प्रक्रिया : ऑफलाइन / ई-मेलद्वारे अर्ज स्वीकारले जातील
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 21 एप्रिल 2025
अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती : अधिकृत वेबसाईट www.mescoltd.co.in वर उपलब्ध आहे
सूचना : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा. कोणत्याही त्रुटींसाठी महामंडळ जबाबदार राहणार नाही.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी : (येथे बघा)
अधिकृत वेबसाईट : (येथे बघा)
रिक्त पदांची सविस्तर माहिती:
1. लिपिक (Clerk)
सशस्त्र दलांतील निवृत्त JCO किंवा त्याहून वरील पदावरील माजी सैनिक / माजी सैनिक विधवा / युद्ध विधवा
MS Office व मराठी-इंग्रजी टायपिंगचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक (प्रमाणपत्र आवश्यक)
मराठी वाचन, लेखन व बोलण्याचे ज्ञान आवश्यक
कार्यालयीन अधीक्षक/मुख्य लिपिक म्हणून अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य
शक्यतो SHAPE-1 वैद्यकीय श्रेणी आवश्यक
महाराष्ट्राचे रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक
2. पर्यवेक्षक (Supervisor)
सशस्त्र सेना दलांतून निवृत्त JCO किंवा तत्सम पदावरील माजी सैनिक
SHAPE-1 वैद्यकीय श्रेणी आवश्यक मराठी भाषा वाचन, लेखन, बोलणे आवश्यक
महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
3. स्टोअर किपर सह कॅन्टीन/वसतीगृह पर्यवेक्षक
सशस्त्र दलांतून निवृत्त स्टोअर किपर टेक्निकल पदावरील माजी सैनिक
मराठी भाषा (वाचन, लेखन, बोलणे) व टायपिंगचे मूलभूत ज्ञान आवश्यक
SHAPE-1 वैद्यकीय श्रेणी आवश्यक
महाराष्ट्राचा रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक
4. वाहन चालक (Driver)
सशस्त्र दलांतून निवृत्त माजी सैनिक
सेवा कालावधीत चालक / शिपाई ते विलदार किंवा समकक्ष पदावर कार्यरत असलेले
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
SHAPE-4 वैद्यकीय श्रेणी आवश्यक
महत्त्वाच्या सूचना:
सदर भरती ही फक्त ठराविक कालावधीसाठी करार तत्वावर असेल.
उमेदवारास या पदावर कायमस्वरूपी नोकरीचा हक्क मिळणार नाही.
कराराच्या कालावधीतील सेवा नियमित करण्याचा कोणताही दावा करता येणार नाही.
उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती पूर्ण करून अर्ज सादर करावा
